शेतकऱ्यांना कर्जमाफी ___ चांगला निर्णय

___ चांगला निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त व कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यतचे कर्ज माफ करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली. ___ शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे पीककर्ज मा | होणार असून मार्च २०२० पासून ही योजना लागु होणार आहे. कर्जमाफीसाठी कोणतीही अट ठेवली नाही. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करऱ्याची गरज नाही. केवळ आधारकार्ड घेवुन बँक खात्याला जोडून आपली ओळख पटवली की कर्जमाफीची प्रक्रिया पुर्ण होईल असे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही सवलतीची योजना लवकरच जाहीर केली जाईल. चालू हंगामाचे येत्या जुनमध्ये जे कर्ज थकीत होईल त्याचे पुनर्गठन केले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार मख्यमंत्र्यांनी जाहीर प्रशासकीय तयारी करण्यासाठी दोन महिने लागतील. बँकांकडून माहिती घेण्यात येईल व मार्च २०२० पासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या कर्जखात्यातून पैसा जमा करण्यात येईल. त्यामळे थकीत पीक कर्ज शेतकरी तसेच अतीवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांचा या निर्णयाचा फायदा होईल. महाविकास आघाडान सरकारन जरा शतकऱ्याचा ७/ १२ पुर्णपणे कोरा केला नसला तरी पण दोन लाखापर्यतचे बरेचसे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. म्हणजेच या सरकारने एकदमच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने न पसता कर्जमाफीचा एक चांगला व लवकर निर्णय घेतला. जेणेकरुन आपला बळीराजा त्यामुळे चिंतामुक्त व कर्जमुक्त होईल यात शंका नाही. तसेच खासदार, आमदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही हा पण एक चांगला निर्णय म्हणावा लागेल.